

कोरोना च्या पार्श्ववभूमी वर आणि सततच्या लॉक डाऊन मुळे जनसामान्यांवर उद्भवलेल्या कोरोना वायरसचा वाढता प्रसार पाहता, तसेच मा.शिवसेना प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार , माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे पालन करून, विभाग क्र.१६६ मध्ये रहाणारे रहिवाशी आणि ज्येष्ठ नागरीक जे कुर्ला पश्चिम येथील बैलबाजार सारख्या वर्दळ ठिकाणी राहतात ज्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉज़िटिव आले हे कळताच कुर्ला पश्चिम येथील बैलबाजार मधिल विभागातील जेष्ठ नागरिकांना “स्त्री शक्ती फाऊंडेशन” तर्फे वॉर्म स्ट्रीम वेपॉरायझर मशीन चे वाटप करण्यात आले, वाटप करण्यात आले याप्रसंगी
“स्त्री शक्ती फाऊंडेशन” च्या अध्यक्ष निशा राहुल मौजे, कार्याध्यक्षा रेश्मा सुभाष बनसोडे ताई…
शिवसेना शाखा क्र.१६६ च्या उपशाखा संघटिका पुजा गणेश तावडे तसेच विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक प्रेमा पितांबर साठले आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष निशा मौजे यांनी स्थानिक रहिवाशी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपले कुटुंब हीं आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा ती प्रत्येकानी पाळली पाहिजे त्यासाठी प्रत्येक रहीवाश्याने सतर्क राहुन मास्क आणि सनीटायझरचा योग्य तऱ्हेने वापर केला पाहिजे.
असे सांगून उपस्थित रहिवाश्यांचे आभार मानले.