
आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नीता कोरेवर फौजदारी कारवाईची मागणी ?
नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’,पेल्हार विभागाच्या सहा.आयुक्त नीता कोरे सद्या चर्चेत आहेत.या प्रभागाच्या सहा. आयुक्त पदाच्या खुर्चीसाठी नीता कोरे व सुरेंद्र पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.पालिका आयुक्तांनी कोरे यांची बदली दी.३ नोव्हेंबर रोजी मुख्यालयात करण्यात आली आहे.त्यांच्या जागी सुरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे.परंतु नीता कोरे यांनी आदेश देऊन २१ दिवस उलटूनही आपला पदभार सोडलेला नाही. या आदेशा ची प्रतही पेल्हार कार्यलयात १० नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे. उलटपक्षी नीता कोरे या मला आदेशाची प्रतच न मिळाल्याचा कांगावा करत सहा. आयुक्त पदाच्या खुर्चिला चिकटून बसल्या आहेत.विशेष म्हणजे पालिका आयुक्त गंगाथरण डी. हे स्थितीप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत
त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरे यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने कोरे
यांच्यावर आयुक्तच मेहेरबान असल्याची चर्चा होऊ लागली आहेत. दरम्यान आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या नीता कोरे यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी सामजिक संघटनाकडून करण्यात येत आहे.
पेल्हारच्या प्र.सहा आयुक्त पदी बोळींज विभागातील वरीष्ठ लिपिक निता कोरे यांची दि. ९ ऑक्टोबर रोजी वर्णी लावण्यात आली होती.या प्रभागात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे.
प्रभागात अनेक ठिकाणी बिनदिक्कत पणे अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.त्याविरोधात त्यांनी अजूनपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही.शिवाय स्वच्छता, रस्ते,पाणी असे अनेक प्रश्न या प्रभागातील नागरिकांना भेडसावत आहेत.परंतु कोरे यांनी पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.त्यातच आता नीता कोरे यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन न करता पेल्हार विभागातच चिकटून राहणे पसंत केले आहे.एकप्रकारे वरीष्ठांच्या आदेशाला धाब्यावर बसवणार्या निता कोरे यांच्या या कारभारामुळे नाराजी व्यक्त होत असून आयुक्तांनी अशा उर्मट अधिकार्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.