
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी एम पेटीट रुग्णालय, पारनाका वसई (प.) येथील नूतनीकृत इमारतीचा लोकार्पण सोहळा व सर डी एम पेटीट रुग्णालयाच्या प्रस्तावित विस्तारित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज बुधवार दि.२५.११.२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता मा.ना.श्री.दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभहस्ते पार पडला. सदर कार्यक्रमास मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत, मा.आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.आमदार श्री.श्रीनिवास वनगा, मा.आमदार श्री.रविंद्र फाटक, मा.जिल्हाधिकारी पालघर डॉ. माणिक गुरसळ, मा.आयुक्त श्री.गंगाथरण डी., माजी महापौर श्री.प्रवीण शेट्टी, माजी महापौर श्री.नारायण मानकर तसेच माजी नगरसेवक व नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सर डी एम पेटीट रुग्णालयाची प्रस्तावित विस्तारित इमारतीमध्ये १०० खाटा उपलब्ध असतील व त्यापैकी आय.सी.यू. विभागासाठी १५ खाटा, प्रसूतीपूर्व विभागासाठी २५ खाटा, बालरुग्ण विभागासाठी २० खाटा, नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी १० खाटा उपलब्ध केल्या जातील. तसेच सर डी एम पेटीट रुग्णालयातील नूतनीकृत इमारतीत २८ खाटा उपलब्ध असून यापैकी महिला सामान्य कक्षासाठी १४ खाटा, विलगीकरण कक्षासाठी ४ खाटा, स्वतंत्र कक्षासाठी १० खाटा उपलब्ध आहेत.
