
वार्ताहर – कोरोना प्रादुर्भाव काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे रोजगार बुडाले अशातच पालघर जिल्ह्यातील काही आदिवासी पाड्यावरील नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून हातावर पोट असणा-या सर्वसामान्य नागरिकांच्या हालअपेष्टा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकताच हिवाळा सुरु झाला असून थंडीचे दिवस वाढत आहे अशातच या आर्थिक विवंचनेत असणाऱ्या आपल्या आदिवासी पाड्यावरील बांधवांना शहरी भागातील जागृत संस्था/सामाजिक कार्यकर्त्यांनी “मायेच पांघरुण व मायेची ऊब” या उपक्रमाअंतर्गत ब्लँकेट वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला.
रविंद्र घरत (पत्रकार) व त्यांचे सहकारी यांच्या निर्देशांने लालठण – तांदुळवाडी – सफाळे – वरई भागातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले साधारणतः २०० कुटूंबियांपर्यंत मदतीचा हात पोहचला.
जिवदानी महिला विकास संस्था व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला तत्पूर्वी ग्रामस्थांनी उपस्थित पाहुण्यांचा यथोच्छित सन्मान केला. जिवदानी महिला विकास संस्था चे सुरेखा सावंत, रोशनी वाघ, सचिन पाटील व मिनाज नदाफ (राष्ट्रीय मँरेथोन धावपटू), भूपेश पाटिल (कुक्कुटपालन विशेषज्ञ) यांनी उपक्रमाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला गेला. वसई मेडीकल आणि एज्युकेशनल ट्रस्ट, पराग तोडणकर, बाळा पाटील, प्रकाश पाटील, मीनल घाडगे, सौ शाम्भवी गाडगीळ, श्री विद्याधर जोशी, सौ स्नेहल चौधरी, सौ ज्योत्स्ना शेलार, श्री प्रणव जोशी यांच्या आर्थिक पाठबळामुळे व आमची वसई चे अध्यक्ष श्री हृषिकेश वैद्य गुरुजी यांचा आशिर्वादाने श्री राजेंद्र ढगे (रुग्णमित्र) यांचा मायेची ऊब उपक्रम यशस्वी झाला.