
26/11/2020 रोजीच्या कार्यक्रमात मा.सुरज भोईर, अध्यक्ष: मैत्री संस्था, मा. वर्षाताई विलास, सदभावना संघ, मा. विलास देवळेकर, जेष्ठ कवी, मा. अरुण गुप्ता,प्रवक्ता: धडक कामगार , मा. फिरोज खान, अध्यक्ष: पालघर जिल्हा आणि मा. आसिफ शेख, युवा अध्यक्ष: पालघर जिल्हा, उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वर्षाताई यांनी संविधान बाबत मार्गदर्शन केले. पापडी चे फिरोज खान यास मैत्री संस्था तर्फे ‘” भारतीय संविधान गौरव सम्मान 2020 देऊन गौरविण्यात आले. तसेच पुढील 2021 च्या सुरुवातीला मैत्री संस्थे तर्फे ” सामाजिक कार्यशाळा ” चे आयोजन करण्यात येणार असल्याचे कळविले. मा. सुरज भोईर साहेबांनी पदाधिकारी यांना मैत्री संस्थेचे आई डी ही वाटप केले. सूत्र संचालन मा. रेजिना अलमेडा यांनी केले आभार प्रदर्शन मा. शालिनी डिसुझा यांनी केले. कार्यक्रमा साठी पापडी गार्डन ची व्यवस्था करून दिली म्हणून मा. सह- आयुक्त , प्रभाग समिती आय , वसई यांचे आभार मानले व मा. पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे यांनी मान्यता दिली म्हणून त्यांचे ही आभार मानले.सदरच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्री संस्थेचे पदाधिकारी मा.आसिफ शेख, मा. शाहिद शेख, मा. शमीम खान, मा.एड.सबा शेख, मा. राष्ट्रपाल रणखमबे, मा.जेर्री मच्यडो, मा.अमजद शेख, मा. मुकेश मकवना, मा. राजेंद्र चोहान, मा.लक्ष्मी मुटभटकल, मा. जया शेट्टी या सर्वांनी फार परिश्रम केले.,