उरण(जगदीश काशिकर)- रायगड जिल्हा: शिवसेना शाखा खोपटे, सुअस्थ हॉस्पिटल पनवेल, प्रा. व्यंकटेश म्हात्रे प्रतिष्ठान, आगरी कोळी मेडिकोज यांच्या संयुक्त विद्यमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उरण तालुक्यातील गणेश मंदिर खोपटे येथे आरोग्य शिबीर मोठया उत्साहात सपंन्न झाले.

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगता यावे या दृष्टी कोणातून खोपटे गावात नागरिकांचे डायबेटीस (शुगर लेव्हल ) व ईसीजी चेकअप करण्यात आले.
नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. या शिबिराला माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे महिला तालुका प्रमुख भावना म्हात्रे, कैलास म्हात्रे, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, शिक्षक रमणिक म्हात्रे, B N डाकी-तालुका संघटक, तालुका प्रमुख -संतोष ठाकूर, अजीत ठाकूर, अनंत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य जागृती घरत, राजश्री पाटील, मीनाक्षी म्हात्रे, भावना पाटील, करिष्मा म्हात्रे, शुभांगी ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, डॉ संजीव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळातही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने सदर उपक्रमाचे नागरिकांनी आभार मानत कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *