


नालासोपारा,(तेहसीन चिंचोलकर): नालासोपारा पूर्व कडून पश्चिम कडे जाण्यासाठी पादचारी पुलाच्या दुरावस्थे मुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
वसई – विरार शहर मनपा याकडे कधी लक्ष घालणार? पुलाची अशी दशा की नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये – जा करावी लागत आहे. पुलाचे सिमेंट चे पेव्हर ब्लॉक निघाले असून, त्या वरून पाय सांभाळून जावे लागते. जर का पाय त्यावर ठेवून नागरिक चालले तर मोठी दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
तसेच पुलावर भिकारी व फेरीवाले आपला मुक्काम थाटलंय त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मनपा प्रशासन एखादी दुर्घटना घडणायची वाटत तर नही पाहत ना ! या पुलाची दुरावस्था अशी आहे की दिवसात तर चालेल पण रात्री ये – जा करणाऱ्या माणसाच्या जीवावर परिस्थिती बेतली आहे. इथून येणारा जाणारा पदचारी एखादा लहान मूल किंवा वयस्कर नागरिक ही असू शकतो. या कडे प्रशासनाने लक्ष घालावे. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी नागरिकांकडू खंत व्यक्त होत आहे.