

वार्ताहर ः नालासोपारा पूर्व येथिल वसई तालुका रिक्षा चालक मालक सेनेचे कार्यालयाचे तोडून त्याठिकाणी सहा अनधिकृत गाळे बांधले होते. सदरचे गाळे तात्काळ तोडून संबंधित विकासकांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष अरविंद्र जाधव अनेक रिक्षा चालकांसह उपोषणावर बसले होते. महानगरपालिकेने सदर उपोषणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित विकासकाला दिलेली नोटीस उपोषणास्थळी झालेली उपोषण कर्त्यांना दिली व पुढील आठ दिवसांत संबंधित गाळ्यावर कारवाई करणार असल्याचे महानगरपालिकेमार्फत सांगण्यात आले . त्यामुळे वसई तालुका रिक्षा चालक मालक सेनेने तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये पुढील पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास पालक मंत्री तथा मुख्य मंत्रीपर्यंत प्रकरण नेणार असल्याचे रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष अरविंद्र जाधव यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.
