◆ धडक कामगार युनियनचा पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

वसई : धडक कामगार युनियनचा पदाधिकारी मेळावा वसईतील रुद्रा शेल्टर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे लाभले. धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी आयोजन केलेल्या पदाधिकारी मेळाव्यास वसई-विरार बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पी. एन. ओझा, धडक कामगार युनियन पालघर अध्यक्ष नेहा दुबे, बी. के. पांडे प्रमुख उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आपली युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते ही आपली शिकवण आहे. कामगार चळवळीत काम करत असताना आपली आलेल्या कामगारांप्रती मनापासून त्याची समस्या दूर करण्याची मानसिकता असायला हवी. राजकारण आणि युनियन क्षेत्रात काम करणे फार वेगळे आहे. आपली युनियन तळागाळातील कामगारांचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक आधाराची गरज असते आणि ती आपण दिली पाहिजे. यावेळी बोलताना त्यांनी आपण जेव्हा स्थानिकपातळीवर नियुक्त्या कराल तेव्हा त्यांना त्याची माहिती असायला हवी त्यांचे काम काय आहे? युनियन कशा पद्धतीने काम करते? याची माहिती असली पाहिजे. असे ते म्हणाले. वसई क्षेत्रात करणाऱ्या हातावर पोट असलेल्या कामगारांकडून 12-12 तास एक वडापाव देऊन काम केले जात असल्याची माहिती आहे. सेक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ओव्हर टाइम न देता डबल-डबल ड्युटी काम करून घेतले जात आहे. त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या आदी अनेक त्यांच्या अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. याबाबतीत युनियनच्या माध्यमातून कठोर भूमिका घेतली जाईल असे ते म्हणाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, कोरोनाकाळात ‘ठाकरे सरकार’ नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. कामगारांचे कोणत्याही प्रश्नांची जाण नसलेले हे सरकार आहे. असंघटित कामगारांचे हाल तर त्याहून गंभीर आहेत अशी खंत त्यांनी यावेळी मांडली.
ऍड. पी. एन. ओझा यांनी बोलताना, कामगारांना मिळणारे न्याय व हक्क यांची माहिती दिली व वसईत यांची कोणती पुर्तता मालक वर्गाकडून होत नसल्याची खंत त्यांनी मांडली.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, अभिजीत राणे यांनी पदरुपी दिलेली ही जबाबदारी व संधीचे नक्कीच सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील असे यावेळी ते म्हणाले.
पालघर जिल्हाध्यक्ष नेहा दुबे यांनी बोलताना, भविष्यात पालघर जिल्ह्यात युनियनची मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळेल अशी ग्वाही त्यांनी अभिजीत राणे यांना दिली.
दरम्यान यावेळी सिद्धेश तावडे यांना वसई-विरार सचिव, रमेश पांडे सचिव वसई पश्चिम, संजय सिंग सचिव वसई पूर्व, कलाधरण नायर कार्यालयीन मंत्री आदी उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती देऊन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कार्यक्रमावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपआपले अनेक वर्षे युनियन सोबत असल्याचे अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *