
शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचा आरोप !

◆ उपोषणाची नौटंकी तसेच आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपकडून प्रयत्न
वसई(प्रतिनिधी) -वसई विरार मध्ये एकीकडे भाजप पदाधिकारी शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचा आव आणत आहेत.तर दुसरीकडे भाजप चे काही वरिष्ठ पदाधिकारी तसेच काही मंडळी दलालीत गुंतल्याचे पहावयास मिळत आहे.असाच काही प्रकार समोर आला आहे.वसई विरार मधील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध पिण्याचे पाणी विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत सहाय्यक आयुक्त पंकज भुसे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांच्या कारभाराविरोधात
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने राज्यसभेचे खासदार पदमश्री डॉक्टर विकास महात्मे आणि माजी विधानसभा सदस्य नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मुख्यालयासमोर नुकतेच लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.या उपोषणा नंतर पाणी माफियांनी नुकतेच भाजप वसई विरार जिल्हाअध्यक्ष राजन नाईक यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
आले आहे. या व्हिडीओत राजन नाईक हेपाणी माफियांना ‘मी तुमच्या सोबत आहे’ असे सांगताना दिसत आहे. त्यामुळे उपोषणाची नौटंकी करून पाणी माफियांना साथ देत
जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप जिल्हाध्यक्षा कडून सुरू असल्याचा आरोप स्पष्ट शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांनी केला आहे.
सद्या वसई विरार पालिका शहरवासीय कर देऊनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शहर वासीयांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.याचा फायदा पाणी माफियांनी घेत शहरात जागोजागी बोगस पाण्याचे प्लांट उभारून अशुद्ध पाण्याची विक्री करत आहेत. याविरोधात भाजपचे अशोक शेळके हे पाठपुरावा करत होते. परंतु पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने शेळके यांनी डॉक्टर विकास महात्मे आणि माजी विधानसभा सदस्य नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण केले होते.या उपोषणानंतर कारवाईच्या भीतीने पाणी माफियांनी भाजप जिल्हाध्यक्षाची भेट घेत आपली व्यथा मांडली.या भेटीमागे मोठे अर्थकारण झाल्याचा आरोपही भोसले यांनी यावेळी केला आहे.भोसले यांनी सांगितले की, आधीच भाजपात अंतर्गत गटबाजीमुळे अनेक निष्ठावंत नाराज आहेत. शिवाय जिल्हाध्यक्षाच्या दलालीमुळे अनेक पदाधिकारी भाजपची साथ सोडत आहेत. त्यातच आता जिल्हाध्यक्षाच्या दलालीचा व्हिडीओही समोर आला आहे.त्यामुळे भाजपने केलेलं आंदोलन एक नौटंकी असल्याचे स्पष्ट होत आहे.