

प्रतिनिधी वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती आय अंतर्गत येणाऱ्या गिरीज तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिकाकडून होऊ लागला असून या प्रकरणात मलिदा ओरपला असा संशय व्यक्त केला आहे हे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे गिरीश तलावाच्या पायर्यांचे बांधकाम करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे लोखंड वापरण्यात आल्याचे दृष्टीस पडते या कामाबाबत तिथल्या नागरिकांनी पाहणी करून ही बाब पालिका अधिकाऱ्याच्या लक्षात आणली होती मात्र पालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदाराने ओरपले ला मलिदा त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्याचा संशय व्यक्त होतोय तलावाच्या सुशोभिकरणात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकणाची चौकशी करावी आणि सुशोभीकरणाचे काम व्यवस्थित रित्या पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांचे बिल अदा करू नये अशी मागणी करण्यात आली