राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री श्री अनील परब ,पालकमंत्री श्री नितीन राऊत विधान सभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी केले कौतुक

आज दिनांक ४ जानेवारी २०२० ला नागपूर विधानभवनात विधिमंडळ सचिवालय कक्ष नागपूर ह्या महाराष्ट्राच्या उप राजधानीत व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केली होती व तिचा पाठपुरावा सुद्धहा मा आमदार प्रकाश गजभिये यांनी केला होता ती मागणी माननीय सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सभेचे अध्यक्ष नाना पटोले व नरहरी झिरवाळ यांनी मान्य केली . म्हणून मा आमदार प्रकाश गजभिये यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
विदर्भातील आमदार, खासदार व सर्वसाधरण जनते करिता त्यांचे प्रश्न सूचना व लक्षवेधी मांडण्याकरिता नागपूर उपराजधानी मध्ये विधानभवनात विधिमंडळाचे सचिवालय कक्ष मा राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार , विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाजमंत्री अनिल परब डॉ नीलम गोऱ्हे, गृहमंत्री श्री अनील देशमुख पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री श्री सुनील केदार यांचे हस्ते विधानसभेचे आजपासून सुरू करण्यात आला. यावेळी आमदार सुनील भु सारा ,विकास ठाकरे, आशिष जैस्वाल, नागो गाणार,राजू पारवे,समीर मेघे, अमोल मीटकरी, जोगेंद्र कवाडे,श्री काज ,श्री आठवले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिमंडळाचे प्रधान सचिव श्री राजेन्द्र भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *