राजकीय क्षेत्रात कोणाला वर आणायचे व कोणाला खाली खेचायचे ह्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. छोट्या पेपरचे पत्रकारही प्रभावी लेखन करून ठसा उमटविला आहेत त्यामुळे कोणाला कमी लेखण्याचे कारण नाही.स्थानिक पातळीवरील पत्रकार हे समाजाचे प्रश्न मांडीत असतात म्हणूनच पत्रकार हा समाजाचा आधारस्तंभ मानला जातो असे प्रतिपादन खासदार राजेंद्र गावीत यांनी केले.
दि.६जानेवारी रोजी विरार येथील देशमुख नगर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून राजेंद्र गावीत यांनी विचार व्यक्त केले. जर्नालिस्ट युनियन आॅफ महाराष्ट्र तर्फ प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. जे.यु.एम.चे अध्यक्ष नारायण पांचाळ हे अध्यक्षस्थानी होते.विशेष अतिथी स्वराज्य शक्ती संघटनेचे अध्यक्ष सागर देशमुख,लायन प्रशांत अनंत पाटील,जे.यु.एम.चे जनरल सेक्रेटरी प्रवीण ना.दवणे, उपाध्यक्ष प्रा.हेमंत सामंत,जयराम सावंत,ज्येष्ठ पत्रकार उमाकांत वाघ,वसई विरार युनिटचे दिपक कोठेकर,सलीम शेख,अॅड.रवी पंडित आदी उपस्थित होते.
जे.यु.एम.तर्फे दिला जाणारा पत्रकार पुरस्कार पालघर जिल्ह्यातील उमाकांत वाघ व रियाझ मुल्ला यांना खासदार राजेंद्र गावीत या़च्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्या नंतर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियातील एकूण ८० पत्रकारांचा स्म्रुतीचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कोरोनाकाळात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सागर देशमुख यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रा.हेमंत सामंत यांनी मराठीत तर हमीद अन्सारी यांनी हिंदीतून सुत्रसंचालन केले.दिपक कोठेकर यांनी शेवटी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *