

वार्ताहर – २०२०च्या कोरोना प्रादुर्भाव काळ हा प्रत्येकाला कठीण दिवस दाखवून गेला, अशातच समाजातील काही घटक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विविध प्रकारे समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होते. अन्नवाटप, सुरक्षा किट वाटप, प्लाझ्मादान, रक्तदान शिबीर, रुग्णांना वैद्यकीय सेवा ईत्यादीच्या माध्यमातून हे सामाजिक कार्यकर्ते समाजात कार्यरत होते. अशा घटकांचा उचित सन्मान करण्याकरिता “कोटक लाईफ” तर्फे सामाजिक पुरस्कार देण्यात आले.
आज दि १३ जाने २०२१ रोजी जे डब्ल्यू मेरिएट पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला. आमची वसई सामाजिक संस्थेचे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे व कुक्कूटपालन अभ्यासक श्री भूपेश पाटिल यांच्या सह पन्नासहून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाभारत फेम द्रोणाचार्य श्री सुरेंद्र पाल यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. श्री मनोज रायजडे (व्हाईस प्रेसिडेंट, मुंबई- कोटक लाईफ), श्री नवीन कुमार (विभागीय प्रेसिडेंट, कोटक लाईफ) ,सौ अंजली कोळवणकर मॅडम (एजन्सी पार्टनर) व कोटक लाईफ टीम ने या कार्यक्रमाकरीता अथक परिश्रम घेतले व अजून अशा घटकांचा विविध विभागात आम्ही सन्मान करू असे सांगितले.
कोरोना कालावधीनंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील पहिलेच पुरस्कार प्रदान सोहळा असल्याने कोटक लाईफ ची समाजाप्रती सामाजिक बांधिलकी दिसुन येत आहे.
