

17 जानेवारी 2021 रोजी जेनी नावाच्या मुलीने नालासोपारा पश्चिम येथे अपघात झालेल्या एका गर्भवती कुत्रीला तात्काळ मदतीची गरज असल्याची व्हॉटसअप पोस्ट एसीपी सुधीर कुडाळकर ह्यांच्या PAL ADOPTION ह्या व्हॉटसअप ग्रुपवर पाठविली होती. ग्रुप मधील एका सदस्याने जेनिला प्रेम गोराडीया ह्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.सायांकाळी 8 च्या सूमारास प्रेम गोराडीया ह्यांना कुत्री संदर्भित बातमी मिळाल्यावर ते अर्ध्या तासामध्ये सांगितलेल्या ठिकाणी पोचले.परंतु कुत्रीला झालेल्या जखमेवरून कुत्रीचा अपघात झालेला नसून तिच्यावर अॅसिड अथवा उकळत्या तेलाचा हल्ला झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःवर झालेल्या अमानुषतेमुळे घाबरलेली कुत्री निर्मनुष्य ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करत होती.स्थानिक लोकांच्या मदतीने प्रेम ह्यांनी कुत्रीला अडवण्याचा प्रयत्न केला. कुत्रीचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला दूध व बिस्किटे खाऊ घातली.साधारण 15 ते 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नांती प्रेम गोराडीया, तीर्थ सावला, डॉ. रोहित यांना तिला कॅचरच्या साहाय्याने पकडण्यामध्ये यश आले. तीर्थ सावला व प्रेम गोराडीया यांनी या कुत्रीला वसई पूर्व येथील पशुवैद्कीय इस्पितळा मध्ये डॉ.कुलदीप ह्यांच्या देखरेखी अंतर्गत उपचारासाठी दाखल केले आहे.मानवी अमानुषतेची शिकार झालेली ही गर्भवती कुत्री vaginal tumor ने देखील ग्रसित असल्याचे स्पष्ट झाले आहे.मानवाच्या स्वार्थी,हीन अमानुषतेला बळी पडणाऱ्या अशा निरपराध जीवांना आपली व्यथा मांडता येत नाही.तरीही संवेदनशीलता बाळगणाऱ्या आणि कर्तव्यामध्ये तत्पर असणाऱ्या प्रेम गोराडीया, तीर्थ सावला यांसारख्या प्राणीप्रेमिंमुळे निरापराध जीवांच्या वर्तमानातील दयनीय अवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडून येईल हीच अशा.