
दि. २० जाने रोजी महानगरपालिकेने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस आंबेडकरी राजकिय पक्षांना डावलले गेल्या संदर्भात आंबेडकरी जनतेमध्ये नाराजी होती .या घटनेबाबात आयुक्तांना निषेधाचे पत्र घेऊन गेलेल्या आंबेडकरी राजकिय पक्षांच्या शिष्टमंडळास महानगरपालिकेच्या ए प्रवेशद्वाराजवळ अडविल्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यात प्रामुख्याने बहुजन पँथरचे एकनाथ निकम , बहुजन समाज पार्टीचे प्राध्यापक डी एन खरे, रिपाइं (ए) चे विजय धनगर रिपाई (आ)चे उदय तांबे, पँथर रिपब्लिकन सेनेचे संजय गायकवाड तथा सर्व पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त भेट देत नाहि , आयुक्त भेदभावजनक सावत्र वागणुक देत आहेत जर या घटने संदर्भात पालिका प्रशासनानी लेखी माफि मागितली नाहि तर आयुक्तांच्या तोंडाला काळे फासू”असा सज्जड इशारा रिपब्लिकन पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी यांनी प्रसिद्धि माध्यमांसमोर दिला होता. अखेर प्रशासनाने नमते घेत सोमवार दि. २५ जाने रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थित महानगरपालिकेत होणार्या आढावा बैठकिला आंबेडकरी राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींना महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे उद्याचे बैठकिचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणानंतर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी म्हणाले कि २० तारखेच्या घटनेसंदर्भात प्रशासनाच्या लेखी स्पष्टिकरणावर आजही आम्हि ठाम आहोत, आंबेडकरी राजकिय पक्षांमध्ये जरी आपसात वैचारिक मतभेद असले तरीही आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांच्या अस्मिता दुखावण्याचा जर कुणी प्रयत्न करेल तर त्याला जशात तसे आणि उत्तर देऊ.