वार्ताहर – पर्यावरण मित्र बहूद्देशीय संस्था, भारत यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय “हिरकणी पुरस्कार 2020” करीता कु पूजा मालती कट्टी यांची निवड करण्यात आली.

नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ती कु पूजा मालती कट्टी यांची ओळख म्हणजे व्यसनमुक्ती व अंमली पदार्थांच्या विक्रिस केलेल्या विरोधासाठी पुढाकार घेणारी व्यक्ती! तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक श्री विजयकांत सागर ते पालघर जिल्ह्याचे खासदार श्री राजेंद्र गावितजी यांच्या कडे यशस्वीरित्या पाठपुरावा करून वेळोवेळी अशा अपप्रवृत्ती च्या घटकांपासुन समाजाला हानी पोहचू नये म्हणून सतत कार्यरत असणारी निडर महिला कार्यकर्त्यी.! महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असता रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला रिक्षा चालक असलेली खास रिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता पुढाकार घेतला. महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न किंवा रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विधानभवनात जाउन विधान परिषदेच्या अध्यक्षा डॉ नीलमताई गोऱ्हे यांच्या जवळ मांडून त्यांना न्याय देणारे महिलांचे नेतृत्व म्हणून कार्यरत आहे. कोरोना महामारी च्या काळात गरजूंना अन्नदान व शिधावाटप स्वखर्चाने केले. ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांकरीता चहा नाश्ता ची सुविधा व महिला पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करुन एकप्रकारे देशसेवाच केली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सबलीकरणासाठी झटणाऱ्या महिला नेतृत्वाची योग्य ती दखल घेत पर्यावरण मित्र बहूद्देशीय संस्था, भारत यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय “हिरकणी पुरस्कार 2020” करीता त्यांची निवड करण्यात आली. नालासोपारा विधानसभा युवतीसेना अधिकारी असलेल्या पूजा कट्टी यांचा सत्कार “शिक्षाकरत्न” सौ विद्या नाईक यांच्या हस्ते नालासोपारा तुळींज शिवसेना शाखेत करण्यात आला. “शिक्षक रत्न पुरस्कार” मिळाल्याबद्दल हिंदूहृदयसम्राट स्व श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तुळींज शिवसेना शाखे तर्फे सौ विद्या नाईक यांचा सत्कार झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *