

वसई विरार शहर महानगरपालिकेची विकास आढावा बैठक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा .दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विरार येथील मुख्य कार्यालयामध्ये घेण्यात आली. त्याप्रसंगी मान. खासदार राजेंद्र गावित, मान.आमदार रविंद्रजी फाटक ,आयुक्त डी गंगाधरण यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गिरिश दिवाणजी यांनी जनतेचे प्रश्न अग्रक्रमाने उपस्थित केलेत. १) घनकचरा व्यवस्थापनाबाबत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील मोठय़ा रहिवाशी संकुलांना संकुल क्षेत्रातच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या यांत्रिक मशिन विकत घेण्याकरिता राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थाना अनुदानित कर्ज उपलब्ध करुन द्यावे . २) नालासोपारा (पु) येथील सर्वोदय वसाहतीतीच्या शेजारील जागेत आंबेडकरी जनतेच्या मागणीचे आंबेडकर भवनाच्या कामाला जलद गतीने सुरवात करुन सदर भवनाची वास्तु हि स्वतंत्र इमारत असावी व त्यात स्पर्धा परिक्षा केंद्र बार्टि या संस्थेला सोबत घेऊन सुरु करावे. ३) १ MLD क्षमता असणारे पापडखिंड धरण ज्याचा पाणीपुरवठा फुलपाडा व जीवदानी रोड परिसराला हाेतो त्या धरणक्षेत्राची सुरक्षा महानगरपालिकेने वाढवावी जेणेकरून आस्थेच्या नावावर चालणारे धरणातील प्रदुषण थांबवण्यात येतील. सध्या या पापडखिंड धरणातून आठ महिने या भागांना पाणीपुरवठा होतो. अन्यथा २३० MLD सुर्याप्रकल्पाचे पाणी १२ हिमहिने द्यावे४)वादग्रस्त असणारे ठेका अभियंता स्वरूप खानोलकर यांना त्वरित महानगरपालिकेच्या सेवेतून मुक्त करावे.व अनधिकृत बांधकामांना पोषक ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. वरील सर्वच सूचनांची दखल मा. पालकमंत्री यांच्याद्वारे घेण्यात आली.
