” जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे “
नायगाव पुर्व भागात कोरोना काळातही प्रजासत्ताक दिन शासनाच्या नियमावली लक्षात ठेवुन साजरा केला गेला . प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र दिवस म्हणुनही संबोधला जातो .
कोरोनाने जिकड जन-जिवन अस्ताव्यस्त केले होते ; ते सर्व-सामान्य माणुस आज पुन्हा पुर्ववत होण्यासाठी धडपड असला , तरी प्रजासत्ताक दिनी मात्र सामान्य माणसात उत्साह खुप दिसला .
नायगाव पुर्वचे समाजसेवक मा. धरेद्र विलास कुलकर्णी यांनी या परिसरात अनेक वसाहतींना सदिच्छा भेट दिली , यातच निरोप मिळाली नायगाव पुर्वच्या सिटीझन काॅलनीत लहान मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातुन कालपासुन प्रदासत्ताक दिनाची तयारी केली होती , आज ते कळताच समाजसेवक मा. धरेद्र विलास कुलकर्णी व समाजसेविका युवाशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा कर्मविर स्नेहाताई जावळे यांनी या लहान मुलांना सदिच्छा भेट देवुन खाऊ वाटला व त्या मुलांचे कौतुक शब्द सुमनांनी केले .
या परिसरातील जनमाणसांना प्रजासत्ताक दिनी संबोधतांना समाजसेवक मा. धरेद्र विलास कुलकर्णी यांनी सांगितले की सर्व धर्म समभाव ही भावना मनात बाळगावे , जात- धर्माच राजकारण न करता आपण नायगांवकर एक कुटुंब आहोत आणि नायगाव पुर्व एक लहान भारत झालाय. आपण असेच एकत्र शांततेत राहु व माणुस म्हणुन आपले सामाजिक कर्तव्य पुर्ण करु .
समाजसेविका स्नेहाताईनी सर्वांना संबोधतांना शासनाच्या नियमावलींची उजळनी करुन दिली व युवाशक्ती फाऊंडेशन कडुन सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या .
अजंता गार्डन ११ , वृंदावन १/२ , परेरा नगर , सिटीझन , नालंदा नं ५ ते १० या सर्व वसाहतीत ही खुप आनंदात व उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा झाला . जय हिंद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *