मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील सर्व सुधारित शहरे व तालुक्यात शासकीय खर्चातुन किंवा श्रमदानातून संविधान चौक व उद्देशिका स्तंभाची निर्मिती करण्यात यावी, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संविधान माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात शिकवणी साठी स्वतंत्ररित्या समाविष्ट करावे यासाठी सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून मागील १० ते १५ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व सदिच्छा भेटीसाठी डॉ. माकणीकर सातत्याने भारतीय संविधान पुस्तिका भेट स्वरूप देत असतात 358 आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना भारतीय संविधान व शिकवणीत समावेश करण्याचे निवेदन दिले आहे, १ लाखाच्या वर संविधान उद्देशिका फ्रेमचे वाटप करून संविधान प्रचार व प्रसारासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे.

गोरेगाव येथील एस एस पाटकर महाविद्यालयात स्व:खर्चाने डॉ. माकणीकर यांनी संविधान उद्देशिका स्तंभ उभारून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करून दिली आहे.

मुंबईत सीप्स गाव येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वर संविधान चौक तर सेंट्रल रोड एमआयडीसी येथे संविधान उद्देशिका स्तंभाची निर्मिती केली आहे.

समता, स्वतंत्र, बंधुता नांदावी व समाजात रुजावी यासाठीण संविधान जनजागृती व साक्षरता महत्वाची असून राज्यातील सर्व मातृभाषेमध्ये संविधान सक्तीने शिकविण्यात यावे व गाव तेथे संविधान चौक उभारण्यात यावेत अशी मागणी मागील १५ वर्षांपासून सम्यक मैत्रेय फौंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतींने करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

सदरचा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यासाठी बौद्ध भिक्षु शिलबोधी, आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांचे मार्गदर्शन कॅप्टन श्रावण गायकवाड, राजेश पिल्ले यांची मोलाची साथ तसेच गौतम कांबळे, आकाश रावते अन्य सहकारी अथक परिश्रम घेत असून लवकरच याचे फलित मिळेल असाही आशावाद डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *