युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत यांच्या सौजन्याने शिवाजी मंदिर, दादर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडून कोरोनाच्या काळात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले अशा पोलीस दलातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस चालक-वाहक, भाजी विक्रेते व गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले . याप्रसंगी युनिव्हर्सल ह्यूमन राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुण बाकोलिया सर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ सुमन मौर्य मॅडम, याचा मार्गदर्शन नुसार कार्याध्यक्ष महाराष्ट्रप्रदेश जितेंद्र दगडू सकपाळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुहास सावर्डेकर, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ.सुवर्णा कदम, ओमकार शिवाजीराव खानविलकर महा.राज्य संघटन मंत्री, सौ.ममता सावंत मॅडम महा.संघटन मंत्री महिला, मुंबई महासचिव अमोल वंजारे मुंबई शहराध्यक्ष सौ.स्नेहा भालेराव मॅडम तसेच श्याम भिंगारदिवे मुंबई उपाध्यक्ष, सचिन जोईजोडे दादर ब्लॉक अध्यक्ष संदीप मोहिते मुंबई उपसचिव, अँड.संतोष आंबेडकर वडाला ब्लॉक अध्यक्ष, सौ.वसुधा वाळुंज चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्ष, आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच सचिन जोईजोडे यांच्या प्रयत्नाने
महाराष्ट्रातील मानवधिकार परिषदेचे भारत येथील दुसरे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले त्याचे देखिल याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ.सुवर्णा कदम मॅडम, ओंकार खानविलकर, अमोल वंजारे यांनी संघटनेच्या तत्वप्रणाली बद्धल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *