

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या विद्यार्थी युनिट आज नियुक्ती करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.संदेश वाघ यांच्या उपस्थितीत डॉ.किरण काळे यांची अध्यक्ष म्हणून तर कोंडीबा हटकर यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुनील मगरे तसेच मुफ्टाचे सचिव प्रा.कोळी सर कार्यकारणी सदस्य पेटकर सर हे उपस्थित होते.आंबेडकरांईट हिस्ट्री काँग्रेसच्या माध्यमातून भावी कालखंडात संदर्भग्रंथ प्रकाशित करणे, परिषदा घेणे पुरातत्वीय लेण्यांचे संवर्धन करण्याकरिता शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करणे, विद्यार्थीना फ्रिशिप,स्कॉलरशिप संदर्भात माहिती पुरवणे व इतिहासातील उपेक्षितांच्या इतिहास लेखनास प्रोत्साहन देणे.आदी अधिकृत कार्यक्रम घेण्याचा माणसं व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस विद्यार्थी युनिटचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विकास गवई, सहसचिव सिंधू लोणकर,उपाध्यक्ष मोनिका चव्हाण यांनी अवरीत प्रयत्न केले.नवनिर्वाचित कार्यकरणीत खालील सदस्यांचा समावेश आहे.डॉ. गौतम घाडगे,निशा भैसारे,डॉ.समाधान बनसोड,अंकुश गवई,भारती खोतकर,बाळासाहेब हिवाळे,विजय मापारी,नितीन आखाडे,अंजली गायकवाड,आश्रू मोरे, संतोष जाधव, सतीश तुपसमींद्रे,भरत हिवराळे, सिल्केशा आहिरे, प्रमोद शिंदे,सौरभ दळवी,विजय कोरडे, परभणी हिंगोली नांदेड औरंगाबाद उस्मानाबाद येथील विद्यार्थी संघटनेची कार्यकारणी नियुक्त करण्यासाठी समन्वयांना जबाबदारी देण्यात आली.डॉ. संदेश वाघ व डॉ. संतोष बनसोड यांनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या विद्यार्थी युनिटची कार्यकारणी यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे.
