


वसई फाटा येथे अनेक महिन्यांपासून वसई फाटा येथील हायवे लगत वसई विरार महानगरपालिका ने बांधलेले गटार तुटल्याने तसेच पाण्याची पाईप लाईन तुटल्याने पाणी रस्त्यावर येत होते.रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.ह्या वसई फाटा येथील हायवे वर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू असते.ह्या सांडपाण्यामुळे अनेक वेळा अपघात ही झाले होते.ह्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.हे सर्व प्रकरण भाजप चे वसई पूर्व मंडळ चे सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली व आश्विन सावरकर यांनी महानगरपालिकेला तसेच आर आय बी यांना अनेक वेळा पत्र देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आश्विन सावरकर यांच्या पत्रव्यवहार तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे हायवे लगत येणारे सांडपाणी तसेच तुटलेले रस्ते बांधण्यात आले.ह्या सदर ठिकाणी भविष्यात होणारी जीवितहानी अपघात तसेच रोगराई पसरण्यापासून टळली आहे.वसई फाटा येथील रस्ते दुरुस्त केल्याने तसेच रस्त्यावर येणारे सांडपाणी बंद केल्याने वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या पाठपुरवा करताना संतोष जाधव ,सूचित म्हात्रे,कैलास पवार,श्रमजीवी चे गणेश भुरकुण्ड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.