वार्ताहर – मा श्री एकनाथजी शिंदे (शिवसेना नेते, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र) व मा खा डॉ श्रीकांतजी शिंदे (खासदार, कल्याण लोकसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त अयोजित केलेल्या हृदयविकार निदान तपासणी शिबीरास भरघोस प्रतिसाद लाभला. सलग १५ दिवस चालणार्‍या या शिबीरात मोफत एंजोग्राफी, एंजोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात आल्या.

 कोरोना प्रादुर्भाव काळात अन्य रुग्णांना उपचारासाठी चालढकल करताना आढळून येत असताना बरेचस्या रुग्णांनी आपले उपचार लांबविलेले होते किंवा आर्थिक अडचणी मुळे उपचारांपासून वंचित राहत होते. या शिबीरामुळे बऱ्याच रुग्णांनी आपल्या उपचारांची सुरुवात नव्याने व निर्णायक स्वरुपात केली. पालघर, ठाणे, कल्याण, मुंबई, रायगड, रत्नागिरी, लातूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब-गरजू रुग्णांनी या शिबीरात सहभाग नोंदवून आपल्या वरील होणाऱ्या उपचारांची थांबवलेली प्रक्रिया पुन्हा सुरू केली. 

शिबीराच दायित्व होरायझन प्राइम हॉस्पिटल, ठाणे यांच्याकडे सोपविण्यात आले असून रुग्णांचा   सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. होरायझन प्राइम हॉस्पिटल चे डॉ हृषिकेश वैद्य व त्यांच्या सहकार्‍यांनी शिबीरातील हृदयविकार रुग्णांच्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करवून दिल्या. डॉ अवधेश प्रताप सिंह व टीम यांनी रुग्णव्यवस्थापन व्यवस्थित हाताळत आहेत. २० फेब्रुवारी पर्यंत चालू असणाऱ्या या शिबीराचा लाभ रुग्णांनी घ्यावा. 

माझ्या बाबांची मोफत एंजोप्लास्टी झाली मी सर्व होरायझन प्राइम हॉस्पिटल टीम चा आभारी आहे, त्यांची सेवा वाखण्याजोगी आहे.

— अजय मिश्रा (ऱुग्ण नातेवाईक, विक्रोळी)

होरायझन प्राइम हॉस्पिटल चे वैद्यकीय कर्मचारी सोप्या भाषेत आजाराबाबत माहिती देतात जेणे करून निर्णय घेणे सोपे जाते.

किशोर निमनकर (रुग्ण – बायपास शस्त्रक्रिया, डोंबिवली)

शिबीराच महत्व जाणून रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होउन आपल्यावरील थांबविलेले उपचार पुन्हा सुरू करावेत.

डॉ अवधेश प्रताप सिंह (व्यवस्थापक, होरायझन प्राइम हॉस्पिटल ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *