

वसई (प्रतिनिधी) -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार दि. १७-०२-२०२१ रोजी पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर येणार असून वसई पारनाका येथील काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असून या मेळाव्यात आगामी महानगरपालिका निवडणूक लढविणे, काँग्रेस पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी करणे तसेच अन्य पक्षसंबंधित विविध प्रश्नांवर संवाद व चर्चा करून युवकांना संबोधित करून मार्गदर्शन करणार आहेत. सदर मेळाव्याचे आयोजन वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसने केले आहे. वसई विरार नालासोपारा येथील सर्व युवक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी युवकांना केले आहे. तत्पूर्वी पारनाका, वसई येथेच पेट्रोल-डिझेल, एलपीजी घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
वसई भेटीनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष दुपारी ४ च्या सुमारास माजी खासदार दामोदर शिंगडा यांच्या वाडा पोशिंद पालघर येथील निवासस्थानी प्रस्थान करणार असून संध्याकाळी ५-३० च्या सुमारास महालक्ष्मी मातेच्या दर्शनार्थ मंदिरास भेट देणार आहेत असे वसई विरार जिल्हा युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक कळविले आहे.