मिरा भाईंदर शहरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.सत्यजितदादा तांबे यांचा दौरा पार पडला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.सत्यजित तांबे मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीला शहरात आगमन झाल्यावर सर्वप्रथम काशिमिरा येथील शहराच्या प्रवेशद्वार स्थित महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून सुरवात केली, त्यानंतर मिरा रोड येथील काँग्रेस कार्यालयात शहरातील नामांकित साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह आयोजित चर्चासत्रात सहभाग नोंदविला, सदर प्रसंगी ठाणे, नवी मुंबई ह्यासारख्या शहरांमध्ये सांस्कृतिक व कला क्षेत्राची एक चांगली चळवळ सुरु असते मात्र मिरा-भाईंदरमध्ये साधं नाट्यगृह सुध्दा नाही, अशी खंत उपस्थित विविध क्षेत्रातील कलाकार मान्यवरांनी श्री.सत्यजित तांबे यांच्या समवेत चर्चा करतांना मांडली.

सबका साथ, सबका विश्वासघात ही भाजप ची नीती!

पहले इस्तेमाल करे, फिर विश्वासघात करे!

शहरातील मिरारोड स्थित जुना पेट्रोल पंप येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारला धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष श्री.सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शहरातील नागरिकांसमवेत संवाद साधला त्याप्रसंगी नागरिकांनी मोदी सरकार प्रति तीव्र भावना व असंतोष व्यक्त केले. घोषणामध्ये सामील होऊन नागरिकांनी आपले दुःख बोलून दाखवले.

सुपर १००० द्वारा संगठन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्षांचे आदेश!
भाईंदर पूर्व, गोडदेव नाका येथील शुभम हॉल येथे मिरा भाईंदर युवक काँग्रेस व ओवळा माजीवडा युवक काँग्रेसची बैठक पार पडली. सदर बैठकीस काँग्रेसचे नेते मा.आमदार श्री.मुझफ्फर हुसैन, युवक प्रदेशाध्यक्ष श्री.सत्यजित तांबे, युवक प्रदेश उपाध्यक्ष श्री.ब्रिज दत्त, युवक ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.आशिष गिरी, जिल्हाध्यक्ष श्री.प्रमोद जयराम सामंत, गटाने नगरसेवक श्री.झुबैर इनामदार, नगरसेवक श्री.अनिल सावंत, नगरसेवक श्री.अश्रफ शेख, नगरसेविका श्री.गीता परदेशी यांचा सह मोठ्या संख्याने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *