मामा पाठोपाठ भाच्यांचा नंबर
माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या पाठोपाठ धवल पाटील व स्वप्नील पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल

बोगस बांधकाम परवानगी वापरून अनधिकृत बांधकाम केले प्रकरणात माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या पाठोपाठ आता त्यांचे सख्खे भाचे धवल पाटील व स्वप्नील पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. एकंदर राऊत यांचे नातेवाईक देखील अनधिकृत बांधकामात लिप्त असल्याचे उघड झाले आहे.

धवल पाटील व स्वप्नील पाटील यांच्यावर बोगस व बनावट बांधकाम परवानगी तयार करून, त्या परवानगीच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करून शासनाची व सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी विरार पोलिस स्टेशन येथे भा.द.वि.स. कलम 420, 467, 468, 471 व 34 आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 53 54 अन्वये गंभीर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

प्रशांत राऊत यांच्या दोन्ही भाच्यांनी आपण मामा पेक्षा कुठेही कमी नाही याची जणू प्रचितीच दिली आहे.

रोम जळत असताना फिडेल वाजवण्यात मग्न असलेला राजा निरो आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणात वसई विरार मधला सर्वसामान्य मराठी माणूस देशोधडीला लागत असताना, आर्थिक दृष्ट्या होरपळत असताना हातावर हात घेऊन तटस्थ बघत बसलेले आमदार यात आता काहीही फरक उरलेला नाही.

असे असताना, शिवसेना युवाकार्यकर्ता श्रेयस म्हात्रे यांनी लोकांची आणि प्रशासनाची झालेली घोर फसवणूक या गंभीर प्रकरणाची दखल घेत दि.२५/०१/२०२१ रोजी माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय नगर विकास मंत्री, पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय, पालिका आयुक्त डि गंगाधरन यांना तक्रार अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने विरार पोलिस स्टेशन येथे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाची उच्चस्थरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचा तडफदार युवा नेता श्रेयस श्रीकांत म्हात्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *