

प्रतिनिधी( गुरुनाथ तिरपणकर)
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक २७ फेब्रुवारी,२०२१ रोजी
जागतिक मराठी भाषा निमित्त शनिवार सायंकाळी ६.३० वाजता दादर येथील धुरू सभागृहात ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक प्रकाश नागणे व चंद्रकांत पाटणकर यांना जीवनगौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंकाचा पुरस्कार आंतरभारती या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. याप्रसंगी लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे, चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, मराठी विचारधारा प्रतिष्ठान चे ऍड.देवदत्त लाड, श्रीमती शुभदा दत्त कामथे, श्रीमती शीला साईल – (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस महानिरीक्षक तसेच धोरण आणि सरसंपादक दक्षता. आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी ज्येष्ठ वृत्तलेखक प्रकाश नागणे संपादित साप्ताहिक शहर टाइम्स आयोजित तसेच ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक स्व.अरविंद शर्मा स्मृती प्रित्यर्थ २०२० सालात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेत महेश्वर तेटांबे यांनी केलेल्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव तसेच त्यांनी दैनिकातुन मांडलेल्या वैविध्यपूर्ण पत्रांतून सामाजिक प्रश्न हाताळून ते मार्गी कसे लागतील यांकडे कल असणारे लोकप्रिय वृत्तपत्रलेखक, सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, महेश्वर भिकाजी तेटांबे यांची शहर टाइम्स यां लोकप्रिय साप्ताहिकाने योग्य ती दखल घेऊन त्यांना श्रीमती शीला साईल – (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस महानिरीक्षक तसेच धोरण आणि सरसंपादक दक्षता.यांच्या शुभहस्ते उल्लेखनीय पत्र म्हणून विशेष पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.