
विरार पूर्व येथील आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचलित एन. जी . वर्तक इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीमती. तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएससी शाळा व पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास नरसिंह वर्तक सर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तिन्ही संस्थांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ” विकास सेवाव्रती वृंद ” या समूहाची स्थापना करून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस केला. सदर सामाजिक उपक्रमाची सुरुवात काल दोन उपक्रमाद्वारे सुरुवात करण्यात आली . प्रथम उपक्रम म्हणजे त्वचा , अवयवदान जागृकता व नोंदणी अभियानची सुरुवात करण्यात आली .सदर अभियान हे रोटरी क्लब विरार व ( रोसडक ) या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व त्यांच्या सहकार्याने सुरू केले . सकाळी ” त्वचा व अवयव दान ” या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते . सदर वेबिनार मध्ये युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते श्री. पुष्कराज विकास वर्तक यांनी अभियानाचे ऑनलाईन उद्घाटन केले तसेच संस्थेच्या प्राचार्य सौ. सारिका रावत मॅडम यांनी ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थितांना सदर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली व वेबीनारचे प्रास्ताविक केले. सदर अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉ. शिल्पा कर्णिक उपस्थित होत्या . त्यांनी सहभागीना तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले . सदर वेबिनार मध्ये संस्थेचे शिक्षक , पालक , शिक्षकेेतर कर्मचारी अशा एकूूण 832 लोकांनी युट्युब थेट प्रक्षेपणद्वारे आपला सहभाग नोंदविला . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका फरहीन खान यांनी केले . दुसरा उपक्रम म्हणजे सफाळे येथील छोटी उचावली ,मोठी उचावली व नागरमोड गावातील आमची शाळा या तीन शाळाचे पालकत्व सदर समूहाच्या शीर्षकाखाली स्वीकारण्यात आले व सदर शाळेत शिकणाऱ्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. समूहातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी काही मनोरंजक कार्यक्रम व खेळाचे आयोजन करून उपस्थित विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला .सदर कार्यक्रमासाठी मंचावर सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व श्री पुष्कराज वर्तक , ऊचावली गावचे सरपंच श्री.रमेश चावरे , उपसरपंच सौ.उज्वला जैन , सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रशेखर रावत सर , एन.जी वर्तक इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या सौ. सारिका रावत , श्रीमती. तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएसई शाळेच्या प्रभारी प्राचार्या सौ.रचना शर्मा व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना कोळवणकर पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पदवी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.शीतल कोरडकर एन.जी वर्तक इंग्रजी माध्यम शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ.संगीता डिसिल्वा व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ.मनीषा अडेलकर आदी मान्यवर उपस्थित होते . श्री. पुष्कराज वर्तक यांनी सदर उपक्रमास आपल्या भाषणात सकारात्मक प्रोत्साहन दिले . उपक्रमाची माहिती शिक्षक श्री.जितेंद्र राऊत यांनी दिली तर आपल्या मधुर आवाजात शिक्षक श्री प्रशांत पाटील यांनी प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली . विद्यार्थ्यांसाठी खेळांचे नियोजन करणाऱ्या सौ. सोनाली ठक्कर , सौ. जान्हवी व सौ. शीतल वर्तक यांनी खूप मौज आणली. सदर कार्यक्रमात एकूण 160 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सौ.जसिंता लोपीस यांनी केले. सदर उपक्रमासाठी एन. जी . वर्तक इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ,श्रीमती. तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएसई शाळा ,पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पदवी महाविद्यालय , या तिन्ही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या या ” विकास सेवावृत्ती वृंदातील ” शिक्षकांच्या परोपकारी वृत्तीचे मनापासून अभिनंदन !