

,दि. ३ मार्च २०२१ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचा ११ वा अर्थसंकल्प सादर करीत असताना आपल्या तोंडावर मुख पट्टी नसल्याचे अनेक प्रसिद्धीमाध्यमांद्वारे निदर्शनास आले आहे. कोवीडच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडावर मुखपट्टी नसल्याने एकीकडे महानगरपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करत असताना आपणाकडून अशा प्रकारची चूक ही शोभनीय नाही.
काही दिवसांपूर्वी मा.पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या तोंडावर मुखपट्टी नसल्याने त्यांच्यावर मा.जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली असता जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून दंडही भरला होता. याच अनुषंगाने आपणही झालेली चुक व नैतिक जबाबदारी स्वीकारुन दोन दिवसांत शासकीय नियमानुसार दंड भरुन ‘कायद्यापुढे सर्व समान ‘असा आदर्श नागरिकांसमोर ठेवावा हि नम्र विनंती अन्यथा आपल्या नावाचा दंड व दहा मुखपट्टी कार्यकर्त्यांच्या लोकवर्गणीतून रिपब्लिकन पक्षातर्फे महानगरपालिका प्रशासनास देण्यात येईल.