

पालघर (प्रतिनिधी) : . जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधिल कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यिता शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलां/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरीता आरटीई २५ टक्के Online प्रवेश प्रक्रिया दिनांक ३.३.२०२१ ते दिनांक २१.३.२०२१ या कालावधीमध्ये पालघर जिल्हयात सुरुवात होत आहे. पालघर जिल्हयातील डहाणु गटात १७२,जव्हार गटात-२९,मोखाडा गटात – २,पालघर गटात -८६५, तलासरी गटात -६८,वसई गटात -२८८५,विक्रमगड गटात २३, वाडा गटात -११३ अशा एकुण ४१५७ इयत्ता पहिली मध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश (Vacancy) आहेत. तरी पालकांना २५ टक्के Online प्रवेशाकरीता अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे आवाहन करण्यात येत आहे. या बाबत सर्व गटशिक्षणाधिकारी,सर्व पात्र शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या गटातील पालकांना आरटीई Online प्रवेशाबाबत आपल्या स्तरावरुन अवगत करुन प्रवेश घेणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.गटशिक्षणाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक है पालकांकडुन दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून घेणार आहेत.