अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाल्याने बांधकाम माफिया झाले सैरभैर

विरार(प्रतिनिधी)– वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाथरण यांनी पालिकेच्या सर्व क्षेत्रातील अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रभारी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या सीयूसी विभागाच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई राबवली जात आहे.याअतिरिक्त आयुक्त आशिष पाटील तसेच प्रभारी सहाय्यक प्रेमसिंग जाधव हे स्वतः कारवाईत सहभागी होत आहेत.अलीकडेच पेल्हार येथील उमर कंपाऊंड .मायकल कंपाऊंड व आजूबाजूच्या परिसरातील हजारो चौरस फुटांचे अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे .दुसरीकडे अवैध बांधकामांवर कारवाई सुरू आहे त्यामुळे अवैध बांधकाम करणारे बांधकाम माफिया बिथरले आहेत. प्रभाग समिती एफ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संखे व त्यांचे अभियंता- कर्मचारी हे देखील या कारवाईत सहभागी होत आहेत‌.विशेष म्हणजे ही कारवाई होत असताना अवैध बांधकाम मधला स्वयंघोषित भाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर कनिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई केल्याच्या मनात राग ठेवून बदली करण्याची खुलेआम धमकी देत असल्याचे प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अवैध बांधकाम बांधणाऱ्या माफियांची आता मजल अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची बदली करण्या पर्यंत गेले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आयुक्त गंगाधरण यांनी खंबीरपणे उभे राहण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.अन्यथा या भू माफियांचे मनोबल वाढून प्रामाणिकपणे करणारे व कठोर कर्तव्य बजावणारे अधिकारी यांचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीतीही काही नागरीकांनी पत्रकारांशी बोलताना दिली
महानगरपालिके मार्फत प्रभाग समिती एफ पेल्हार येथील अवैध बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. प्रभाग समिती फ चे प्रभारी आयुक्त मोहन संखे यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या प्रभागात होणाऱ्या सर्व अवैध बांधकामाचे सर्वे करून तसा अहवाल गंगाथरण डी.यांना पाठवला आहे .या अहवाला नुसार अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे .मागील चार महिन्यांपासून प्रभाग समिती एफ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम ची निर्मिती सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारी मुख्य कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या .त्यानुसार आयुक्त यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित प्रभाग समिती मधील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई करताना अत्यंत गोपनीयता पाळली जात असून कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप होऊ नये अवैध बांधकाम करण्यासाठी कोणीही मध्यस्थी करू नये यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोन बंद केले जात आहे.तसेच शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठे कारवाईला जाणार आहे याची खबर गुप्त ठेवली जात आहे. त्यामुळे आज व उद्या नेमकी कुठे होणार आहे याचा अंदाज कोणाला येत नाही. त्यामुळे अवैध बांधकाम करणारे बिथरले असून प्रेमसिंग जाधव तथा मोहन संखे या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना बदली करण्याच्या धमक्या काही अवैध बांधकाम माफियांनी दिले आहेत. पन्नास लाख रुपये खर्च झाले तरी चालतील तुमची बदली तात्काळ करतो आमचे मंत्रालयापर्यंत संबंध आहेत अशा वल्गना सध्या अवैध बांधकाम करणारे बांधकाम माफिया करत असल्याचे समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे आयुक्त या अवैध बांधकाम माफियांच्या दबावाला बळी पडतात का की कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वास्तविक आयुक्तांनी आपले जीव धोक्यात घालून अवैध बांधकामावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची अत्यंत गरज आहे .त्यामुळे भविष्यात अवैध बांधकाम करणाऱ्यांचे
डोके वर निघणार नाही व वसई विरार शहर महानगरपालिका येथील अवैध बांधकामांची समस्या समूळ नष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *