काल जागतीक महिला दिना निमित्त समाजसेविका कर्मविर स्नेहा जावळे यांना झुम मिट वर रोटरी कल्ब दिल्ली साऊथ मेट्रोपोलिशन तर्फे जागतिक स्थरावर प्रमुख पाहुणे म्हणुन जुडण्याची संधी मिळाली . या मिटींगला जगभरातुन रोटरी मेंबर जोडले गेले होते . कॅनडा , लंडन जर्मन सिंगापुर कलकत्ता , दिल्ली चंदीगड व मुंबई अशा जगभारातुन माणस एकत्र आली होती . यात मला मोटीव्हेशनल स्पिकर या नात्याने बोलण्याची व समाजीक स्तरावर कशी व काय काम करते सांगायला मत मांडायला मिळाले . यात माझी स्वत:ची स्टोरी ही सागायची होत तसेच स्त्रीयांनी स्वत:साठी स्वत:च्या हक्कासांठी कसे लढावे यावरी चर्चा झाली . व सरते शेवटी काही प्रशन-उत्तरांचा भाग होता व नंतर मला विचारले तुमच्या कार्याला मदत म्हणुन आम्ही काय करावे यावर मी एक -दोन विनंती वजा मागणी केली ” ॲसीड व्हिक्टीम सारख्या सर्व बर्न ( जळीत महिला ) साठी ही शासनाने जाॅब मध्ये आरक्षण काही जागा द्यव्यात व शासनाकडुन पाच लाखापर्यंतची मदत मिळते ती पण इतर कोणत्याही पद्धतीच्या बर्न व्हिक्टीम महिलांनाही मिळावेत . त्यांना शासनाकडुन मोफत गरजेचा औषधी उपचारही मिळावा. त्यावर माझी मागणी चिफ हेल्थ मिनिस्टर कडे पोहचवण्याची जबाबदारी रोटरी दिल्ली प्रेसिडेंट राजीव जींनी घेतली . हे अस झाला तर महिला दिनाचा शासनानी दिलेल मोठ गिफ्ट बर्न व्हिक्टीमसाठी असेल . महिला दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *