

वसई गाव, दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास महावितरणच्या वसई नागरी उपविभागांतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महेश विजय माधवी यांच्या नेतृत्वात माननीय अधिक्षक अभियंता श्री. राजेशसिंग चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी योजना २०२० अंतर्गत कृषी ऊर्जा पर्व साजरे करून बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅली दरम्यान कृषी योजना २०२० अंतर्गत होणारी थकबाकी माफी, थकबाकी पोटी भरावयाची रक्कम, त्यातून जमा होणाऱ्या निधी मधून शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणारे वीज वाहिनीचे जाळे आणि देण्यात येणारे नवीन कनेक्शन याची माहिती वीज ग्राहकांना देण्यात आली आणि वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. सदरच्या माहितीसाठी खोचिवडे ग्रामपंचायत, तरखड ग्रामपंचायत, रानगाव ग्रामपंचायत आणि गिरीज ग्रामपंचायतीच्या आवारात आणि मोक्याच्या ठिकाणी कृषी योजना २०२० चे पोस्टर लावण्यात आले. सदरच्या रॅलीला श्री. महेश विजय माधवी यांच्या सोबत सहाय्यक अभियंता श्री. संजय पाटील (वसई ३ शाखा), श्री. जयंत काकुलते (वसई १ शाखा), श्री. सोमनाथ जाधव (सांडोर शाखा), श्री. गुरुदास कातकर (उमेळमान शाखा), कनिष्ठ अभियंता श्री. ब्रम्हानंद चौधरी (गिरीज शाखा) आणि श्री. राहुल नालवार (मुळगाव शाखा) उपस्थित होते. तसेच एकूण २५ जनमित्र कृषी ऊर्जा पर्वाचे टी शर्ट आणि टोपी घालून रॅलीला उपस्थित होते.