
वसई- वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मदिना चाळ धानीव बाग या ठिकाणी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अरविंद पटेल, दुर्गेश ठाकूर, राहुल सहानी, रोशन प्रजापती, अमित सहानी, मल्लिकार पासवान, राठोड, योगेश, निशांत, देशमुनी, राजेश गोंड व इतर इसमांनी केला असून या लोकांनी मुस्लिम समाजातील लोकांवर रात्रीच्या वेळी जिवीतहानी हल्ला करून घरातील सामान व गाडीची तोडफोड करून महिलांना मारहाण करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३२५/२०२१ भारतीय दंड संहिता कलम ३९५,३२४,५४२,४२७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान यांनी घटना स्थळी भेट दिली व हॉस्पिटल मध्ये जाऊन पीडितांची विचारपूस केली. सदर गुन्ह्याचा तपास वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले करीत सदर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.सदर गुन्ह्यातील आरोपी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. वरील आरोपी लोकांनी मदिना मस्जिद समोर असलेला सीसी केमेरा व तिथे उभे असणारी गाडी यांची तोडफोड केली व महिलांवर जीवितहानी हल्ला केल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी लोकांना अटक केली आहे व काही इसम फरार आहेत. सदर ठिकाणी वरील इसमांकडून पुन्हा दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न सुरु आहे असे तेथील नागरिकांचे म्हणणे असल्याने बहुजन महापार्टीचे महासचिव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवसाहेब ठाकरे,गृहमंत्री मा.ना.श्री.अनिलजी देशमुख, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त मा.श्री.सदानंद दाते,पोलीस उपायुक्त मा.श्री.संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मा.श्री.अमोल मांडवे यांना निवेदन देऊन मदिना मस्जिद समोर एका आठवड्यासाठी सदर घटना स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे व तेथील नागरिकांचे झालेले नुकसान संबंधित आरोपी लोकांकडून वसूल करून पिडीत लोकांना द्यावे व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदर गुन्ह्यात असल्याने सदरची घटना पूर्वनियोजित होती का ? सदर प्रकरणात भाजपचे मोठे नेते सामील होते का ? सदर घटना घडवून आणण्याचा उद्देश काय ? याचाही तपास होणे गरजेचे आहे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.