

बंजारा समाजाचे सुपुत्र व आमदार तथा माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या सोबत प्रा.सी.के.पवार बंजारा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक यांचा आठवड्यातील प्रत्येक रविवार व सोमवार रोजी महाष्ट्रातील बंजारा सामाजिक बहुल जिल्हा,तालुका तसेच तांडावस्ती मध्ये दौरा असणार आहे त्याची सुरुवात वसई,पालघर जिल्ह्यातून होणार असून दौऱ्याचे प्रारंभ
सोमवार दिनांक 5 एप्रिल,2021 रोजी रेस्ट हाऊस,वसईगाव येथून सुरूवात होणार आहे.
दौर्यावर असताना खालील विषयावर चर्चा करण्यात येईल. यासाठी दौऱ्यादरम्यान कोरोना नियमाचे काटेकोर पालन करणे हे सर्व संबंधितांना अवगत असावे.
1) जिल्हा समन्वय समिती सदस्यांची सदिच्छा भेट
2) कोरोना काळात मजूरी करणारे जिल्ह्यातील गोर बंजारा समाजाचे नागरीक व तांड्यातील समस्यां जाणून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा
3) पोहरागड येथे होणाऱ्या नंगारा संग्रहालयासाठी आवश्यक असणाऱ्या समाजातील दुर्मीळ वस्तू,दस्तावेज,चलचित्रांचे संकलन
4) जिल्ह्यातील गोर बंजारा बहूल मतदारसंघ तसेच प्रमुख तांड्याना भेटी देणे
5) राज्यातील सर्व जिल्ह्यातील दौरा आढावा घेऊन नंगारा संग्रहालयाची अंतर्गत बाबी निश्चित करणे व प्राप्त समस्यांवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविणे
6) ऐनवेळचा विषय
दिनांक व स्थळ
सोमवार दिनांक 5 एप्रिल 2021 दुपारी 12 वाजता वसईगाव रेस्ट हाऊस,वसई,जि पालघर.
आणि सायंकाळी 4.30 वाजता पालघर शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका,जि. पालघर.