वसई प्रतिनिधी – राज्यात सध्या कोविड च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाचे कंबरडे मोडले आहे सध्या कोविड रुग्ण उपचारा अभावी मृत्यू पावत आहे शासनाने 15 एप्रिल पासून 1 मे पर्यन्त ब्रेक द चैन च्या नावाखाली महाराष्ट्र लॉक डाऊन जाहीर केला आहे हा लॉक डाऊन जाहीर करताना गोरगरीबासाठी मोफत अन्न धान्य सह रिक्षा चालक, खावटी योजना तसेच अनेकासाठी पॅकेज जाहीर केले आहे मात्र कोविड रुग्णांसाठी कोणतीच योजना जाहीर झालेली नाही सध्यस्थीतीत मागील वर्षभरापासून कोणीच चांगले उत्पन्न मिळवलेले नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा परिस्थितीत एखाद्या रूग्णास कोविड आजार झाल्यास त्याला कोणतीच योजना नसल्याने पैसे अभावी लोक।मरू लागले आहेत म्हणून शासनाने या रोगावर उपचार घेणाऱ्या साठी एखादी योजना जाहीर करावी तसेच मृत व्यक्तीच्या कुटूंबास आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी विशेष कार्यकारी अधिकारी तथा ग्रंथमित्र डॉ अरुण घायवट यांनी केली आहे.
देशात कोविड आजाराचा प्रसार झपाट्याने वाढू लागल्याने गेल्या वर्षी 22 मार्च पासून लॉक डाऊन जाहीर झाला होता पहिल्या लाटेत अनेक कोविड चे रुग्ण दगावले होते आता कोविड ची दुसरी लाट पहिल्या लाटे पेक्षा भयानक होत आहे विशेष म्हणजे कोविड रुग्ण एकदा खाजगी रुग्णालयात दाखल झाला की उपचाराचा खर्च 95 हजार पासून 15 लाख इतका अपेक्षित असतो इतर रोग झाल्यास विविध योजने अंतर्गत बिल कमी होण्यास मदत होते मात्र कोविड आजारासाठी खाजगी रुग्णालयात कोणतीच योजना नसल्याने मोठं मोठी बिल रुग्णाच्या हाती पडू लागली आहेत इतकं बिल भरून सुद्धा रुग्ण बरा होतोच अस नाही त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण आजारातून बरा होण्याचं टेन्शन असताना वाढत्या बिलाचाही मोठा धसका बसत आहे. सरकारी रुग्णालयात हव्या तश्या सोयी नसल्याने सध्या खाजगी रुग्णालये भरू लागली आहेत. मात्र अशा रुग्णासाठी काहीच योजना नसल्याने बिल कमी होण्याचा प्रश्नच येत नाही त्यात खाजगी रुग्णालये अशा वेळी धंदा करतात ते वेगळेच. रुग्णाचा वाढता आकडा आणि राज्यातील हतबल असलेली आरोग्य यंत्रणावरील ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून ब्रेक द चैन नावाखाली लॉक डाऊन जाहीर करत गोर गरिबांसाठी मोफत शिवथाळी रिक्षा चालक, खावटी योजनेतील कामगार, संजय गांधी निराधार योजना आणि इतर अनेक लोकांसाठी आर्थिक हातभार जाहीर केला आहे मात्र कोविडच्या रुग्णासाठी कोणतीच योजना नसल्याने नाराजगी व्यक्त होत आहे खरी गरज या रुग्णांना आहे एकही योजना नसल्याने मोठया रक्कमेची बिल भरून गोर गरीब लोक भिकेला लागत आहेत बिल भरून देखील रुग्ण वाचेल याची गॅरंटी नाही. कोविड रुग्णांना मदत जाहीर करावी म्हणून एकही राजकीय नेत्याने आणि विरोधी पक्षांनी देखील मागणी केली नसल्याने कोविड रुग्णाचा विसर पडला की काय असे वाटू लागले आहे. वास्तविक कोविड आजार हा नैसर्गिक आजार असून सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून उपचार घेणाऱ्या किमान गरीब रुग्णांना पेकेज जाहीर करावे तसेच या आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी आणि अशा दुःखी कुटूंबाला आधार द्यावा अशी रास्त मागणी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अरुण घायवट यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *