


प्रतिनिधी :
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन लावण्यात आलेले असून संचार बंदी असताना वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात आज सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. याकडे प्रशासनाचे लक्षच नव्हते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन लावण्यात आलेले असून संचार बंदी असताना वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात आज सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. शासनाने लागू केलेल्या नियमावली नुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बाजार खुले ठेवण्यात आले असले तरी त्यां ठिकाणी गर्दी होता कामा नये. असे असताना जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात शेकडो लोकांनी खचाखच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. नियमांचे उल्लंघन झाले असताना प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले होते.
सदर प्रकारास जबाबदार प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.