
धडक कामगार युनियन आणि भाजपतर्फे मदत केंद्राचे उदघाटन संपन्न

दिनांक 24: वसई विरार शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले असताना त्यांना धीर देण्यासाठी आज धडक कामगार युनियन आणि वसई विरार जिल्हा भाजप यांच्यातर्फे वसई रोड येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी या मदत केंद्राचे उदघाटन केले. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अभिजित राणे म्हणाले की, ठिकठिकाणी अशी मदत केंद्रे उभारली जाणार असून कोरोना रुग्ण, कोरेन्टाईन केलेले इत्यादी आणि लसीकरण करणाऱ्या नागरिकांना या मदत केंद्रामार्फत योग्य ती मदत केली जाईल. यासाठी जवळपास युनियन व पक्षाचे दहा हजार कार्यकर्ते काम करणार असल्याचे म्हणत होम कोरेन्टाईन असलेल्या रुग्णांना जेवणाचे वाटप, रुग्णांना अंब्युलन्स, हॉस्पिटल बेड, ऑक्सीजन बेड इत्यादी सेवा पुरविण्यासाठीच ही मदत केंद्रे काम करतील. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या यामुळे फ्रंट लाईन वारकर व हेल्थ वर्कर्स काम करण्यास धजावतात. डॉक्टर्स निराश आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे म्हणत हे काम धडक कामगार युनियन आणि भाजप संपूर्ण राज्यात करणार आहे असे ते म्हणाले. यावेळी धडकचे राज्य उपाध्यक्ष व भाजप जिल्हा सरचिटणीस उत्तम कुमार, भाजपा वसई-विरार युवा मोर्चा चे अध्यक्ष अभय कक्कड, भाजपा वसई रोड मंडळ अध्यक्ष रामानुजम, भाजपा वसई रोड मंडळ उपाध्यक्ष दीपक शर्मा, उदय शेट्टी, प्राणिल गाडा, शेमल, मनोज चोटालीया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिजीत राणे पुढे म्हणाले, मागील कोरोना काळात सर्वांनी चांगले काम केले मात्र आता त्याला ओहोटी लागली आहे हे दुर्दैव असे म्हणत अभिजित राणे म्हणाले की, अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे असे यावेळी ते म्हणाले.
विरारच्या दुर्दैवी घटनेतील मृतांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकार आणि येथील महापालिका प्रशासन हतबल आहे. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करावी. राज्य सरकारवर आसूड ओढत अभिजीत राणे म्हणाले की, रुग्णांनी शासनाकडे रेम्डीशिवीर ची मागणी केली तर ती उपलब्ध होण्यासाठी उशीर होतो किंवा अनेक अडचणी निर्माण होतात मात्र तेच रेम्डीशिवीर काळ्या बाजारात चढ्या भावाने तात्काळ उपलब्ध होतात तसेच रुग्णांना शासनाकडून ते उपलब्ध झाले हे दिसत नाही.