

ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष खालिद शेख हृदयविकाराच्या तीव्र झटकेने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे.खालिद शेख यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच रिक्षा चालकांन मध्ये शोकाकूल वातावरण आहे. माजी मंत्री तथा लोकनेते गणेश नाईक यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून 25 वर्षापासून ते रिक्षा संघटनाचे काम करत होते. व बहुजन विकास आघाडीचे देखील सक्रिय कार्यकर्ता होते. खालिद शेख यांचे मनमिळावू स्वभावामुळे ते पालघर जिल्ह्यात रिक्षा संघटनेमध्ये ते लोकप्रिय लीडर म्हणून ओळखले जायचे, रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच मोलाचा योगदान आहे. तसेच त्यांना मानणारा रिक्षा चालकांमध्ये मोठा वर्ग होता. सर्वधर्म सम भाव म्हणून ते संघटनेत काम करताना दिसून यायचे खास करून हिंदू धर्माच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हायचे, त्याचं अंतिम दर्शनासाठी ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेना तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.