कॉरोना पेशंट करिता नव्याने १००० बेडची नव्याने दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात व्यवस्था करण्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस चे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांना भेटले नागपूर शहरातील कोरोणाचे ७००० ते १०००० च्या वर पेशंट अनेक सोयींपासून वंच्छित राहून शेकडो पेशंट मृत्युमुखी पडत असल्याची माहिती मा आमदार प्रकाश गजभिये यांनी मा मंत्री महोदय श्री अमित देशमुख यांना दिली
नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉक्टर, नर्सेस, लॅब असिस्टंट व हेल्थ केअर वर्कर ची नव्याने नियुक्ती करावी .GMC व IGMC येथे MRI व नवीन सिटीस्कॅन मशीन लावण्यात यावी मृत्यूंचे प्रमान खूपच वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे व मारचुरी मध्ये सुध्दा भिड कंट्रोल करणे कठीण झाले आहे तिथे पुरेसा कर्मचारी वर्ग नवीन भरती करणे आवश्यक आहे
रेमेडीसिवर, बिवाईसिझुमाब, टोसीलीझुमाब, इटोलीझुमाब इंजेक्शनचां व ऑक्सिजनचा खूपच तुटवडा आहे हे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी माननीय मंत्री महोदय श्री अमित देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा करून नागपूरच्या भयंकर वाढत्या कोरोनाविषयी परिस्तिथी लक्षात आणून दिली यावर माननीय अमित देशमुख यांनी १५ दिवसात सर्व परिस्तिथी आटोक्यात आणू व ऑक्सिजन ,बेडची व इंजेक्शनची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले
यावेळी मा आमदार प्रकाश गजभिये यांचे समवेत आमदार विकास ठाकरे, आ राजू पारवे, आं अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री,प्रसन्न तिडके जीएमसी चे अधिष्ठाता डॉ सुधीर गुप्ता व आय जी एम सी चे अधिष्ठाता डॉ अजय केवलिया प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *