पालघर दि. 28 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे कार्यालयात काम करणे अशक्य होते. तसेच या कार्यालयासमोरील रस्त्यालगतची जागा खाजगी असून ती निमुळती असल्याने सदर ठिकाणी मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोकोकर्ते यांनी मंडप उभारल्याने अथवा ते सदर ठिकाणी उभे राहील्याने सदरच्या जागेवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हे खाजगी इमारतीत असल्याने व त्यासमोर उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते यांचेसाठी मंडप उभारणे अथवा उभे राहण्याकरीता पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच या भागात रासायनिक कंपन्या असल्याने त्यांचे अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने वाहनांचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता, सदर जागेत मोर्चे, उपोषणे, धरणे, रास्ता रोको व आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनार्थ-9 इमारत, बिडको नाका, नवली, ता.जि.पालघर पासून 100 मीटरचे परीसरात प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी पालघर यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ 9 इमारत, बिडको नाका, नवली, ता.जि. पालघर या कार्यालयापासून 100 मीटरचे परीसरात विविध राजकीय पक्ष व विविध संघटना, तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर) सुरु ठेवणे, वाद्य वाजवणे, कार्यालयसमोर मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलने व रास्ता रोको करण्याकामी प्रवेश करण्यास दि. 04/05/2021 रोजी 00.01 वा. पासून ते दि. 01/07/2021 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
सदरचा मनाई आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी, विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी व खाजगी व्यक्ती, शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरीक, राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती, तसेच विविध राजकीय पक्ष व विविध संघटना, तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या ज्या व्यक्ती जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेकामी येणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत येतील अशा 5 पेक्षा कमी संख्येने येणाऱ्या व्यक्ती यांना सदरचा मनाई आदेश लागू राहणार नाही.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *