


वाढता करोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी दिली आहे. त्यानंतर दुकाने सुरु राहिल्यास पालिका कर्मचारी कारवाई करत आहेत. अशीच कारवाई करण्यासाठी वसई विरार महानगर पालिका प्रभाग समिती ब चे पथक रेहमान नगर नालासोपारा पूर्व येथे गेले असता त्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली. यात २ जन गंभीर जखमी आहेत तर ३ जणांना दुखापत झाली आहे.
प्रभाग समिती ब चे प्रभारी सहायक आयुक्त आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी गेले असता येथील फेरीवाल्यांनी विरोध केला. आणि १०० ते १५० जणांचा जमाव तयार झाला. या जमावाने महापालिका पथकाला मारहाण केली. आणि पोलिसांवर दगडफेक केली. तुळींज पोलिसांनी यः प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक करणयात आली आहे व 25 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….