

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलंपदामंत्री आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांनी आपल्या पक्षाची धुरा पक्ष अत्यंत अडचणीत असत्तांना तसेच राज्यातील अत्यंत मोठ्या ताकतीचे मातब्बर नेते पक्ष सोडून गेले असताना सुद्धा श्री जयंत पाटील डगमगले नाही व तसेच भाजपाने दाखविलेल्या भीतीने व पोलीस,इन्कम टॅक्स,ईडी,सीबीआय चौकशी व अन्य चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नेते व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे वंशज सुद्धा डगमगले व त्यांनी सुध्दा भाजपा मध्ये प्रवेश केला ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांनी लीहलेल्या सुवर्ण इतिहासावर काळा कलंक लावणारी घटना आहे. राज्यभरातून जवळपास साठ टक्के मंत्री, आमदार खासदार घाबरले व भाजप वासी झाले. पक्ष खिळखिळा कमकुवत व एकही आमदार व खासदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती पक्षाची झाली होती साहेबांची या सर्व हालचालीवर बारीक नजर होती .माझा विश्वासू सहकारी जयंत पाटील माझी साथ देऊ शकतो अशी साहेबांची खात्री पटली व साहेबांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशध्यक्षपदी जयंत पाटील साहेब यांची निवड केली पायगुण चांगला लागला भाजप मध्ये पक्ष प्रवेश करणारी माणसं थांबली नवीन माणसं मातब्बर माणसांची जागा घेऊ लागली जयंत पाटील साहेब यांची पकड पक्षावर घट्ट होऊ लागली पक्षामध्ये नव्याने उत्साह संचारला. गावाखेड्यातून गरीब ,सर्वसामान्य माणूस,व्यापारी, उद्योगपती,माणसं रस्त्यावर आली पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या माणसांना धडा शिकवण्याची शपथ जुन्या साहेबांना मानणाऱ्या लोकांनी घेतली मोठ्या साहेबांनी जयंत पाटील साहेबांच्या पायाला भिंगरी बांधली जयंत पाटील साहेब नवीन नवीन योजना आखू लागले तर एक बूथ १०० युथ योजना आणली लाखो तरुण जोडले संपूर्ण सोशल मीडिया वर कब्जा केला राज्यात सर्वांना नवीन मोबाईल विकत घ्यायला लावले राष्ट्रवादीची ध्येयधोरणे मोबाईल वर दिसायला लागली पवार साहेबांची विकासकामे,महिलांना न्याय, राज्यात मागासवर्गीय जनतेला सन्मानाचे स्थान दिले हे जयंत पाटील साहेब जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी पक्षाची विश्वासाहर्ता वाढली व ५६ आमदार व ५ खासदार निवडून आले आदरणीय पवार साहेब आदरणीय प्रफुल पटेल आदरणीय सुप्रिया ताई सुळे आदरणीय अजित दादा आदरणीय रामराजे आदरणीय छगन भुजबळ आदरणीय हसन मुश्रीफ आदरणीय दिलीप वळसे पाटील व अन्य नेत्यांची जयंत पाटील साहेबांनी जबरदस्त पक्षबांधणी केल्यामुळे खऱ्या अर्थाने मने जिंकली आज तीन वर्ष झाली परंतु संघर्ष यात्रा, राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय डिजीटल मोहीम मध्ये ७ लाख कार्यकर्त्यांनी अभिप्राय नोंदवला व कंप्लीट बूथ कमिटी गाव गाव ते शहर शहर पर्यंत राबविली. राष्ट्रवादी परिवार जन संवाद यात्रा काढून पक्ष बांधणी कार्यक्रम राबवला १८ दिवस ,१४ जिल्हे ,८२ विधानसभा मतदारसंघ,१३५ बैठका, १० जाहीर सभा व ३००० किलोमीटरचा दौरा कार्यकर्ते कधीच विसरणार नाही. साहेबांची नजर तीन पक्षाच्या महविकास आघाडी तयार व्हावी याकडे वळली व लगेच सत्ता स्थापन केली आश्चर्याचा सुखद धक्का काँग्रेस व शिवसेनेला दिला याचे श्रेय आदरणीय पवार साहेबांना जातेच जाते परंतु राष्ट्रवादीचे प्रदेशाधयक्ष जयंत पाटील साहेब यांना सुध्दा जाते आज तीन वर्षात बऱ्यापैकी राष्ट्रवादी पक्षसंघटना मजबूत केली त्याचे श्रेय सुद्ध्दा जयंत पाटील साहेबांना काही अंशी जाते…….. आपले प्रदेशाध्यक्ष म्हणून तीन वर्ष संघर्षाची व अग्नीपरिक्षा राहिली परंतु सत्तेपर्यंत पोहचण्याची यशस्वी पायगुनाची सुद्ध्दा राहिली असे म्हणण्यात काही गैर नाही आपल्याला पुढील काळात यशस्वी वाटचालीस शुभेच्छा
मा आमदार प्रकाश गजभिये