कर्मवीर स्नेहा जावळे समाजसेविका / पत्रकार

करोनाने सर्वांचेच जिवन बदलले , पत्रकार ही कामामुळे जिवानिशी गेले पण त्यांना कोणी वाली नाही मिळाले .
पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक आहेच आणि तो ही तितकाच महत्वाचा आहे जितके बाकी तत्काळ व महत्वाच्या सेवेतील व्यक्ती आहेत . मग त्यांच्या मानाने सामान्य स्थरावर कार्यरत असणाऱ्या व कामासाठी आपली जिव धोक्यात टाकुन घटना स्थळी जावुन समाजा समोर योग्य माहीती देणारा पत्रकार या कोरोनात उपेक्षित का आहे ?
कोरोनाच्या पार्श्व भुमिवर गेल्या वर्षी २० मार्च २०२० ला पहिली संचारबंदी व लाॅकडाऊन चालु झाले ते आज दि ३० एप्रिल २०२१ पर्यंत ११० पर्तकारांचा मृत्यु हा कोरोनामुळे झाला . पत्रकार हा हौस म्हणुन फिरत नव्हता उलट समाजाला योग्य ती बातमी पोहचवण्याच्या जबाबदारीमुळे तो घटना स्थळी जात होता आणि त्यातुन या मृत्यु पावलेल्या पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग होवुन के मरण पावले .
यात प्रामुख्याने सांगायचा मद्दा हा आहे की हा लहान स्थरावर काम करणाऱ्या सामान्य पत्रकाराला या व्यवसायातुन मुबलक लाभ मिळत नाही , तरी तो समाजाप्रती आपली जबाबदारी म्हणुन काम करतो. हा लहान पत्रकार आपला जीव धोक्यात घालुन काम करत होता म्हणुन त्यांना कोरोना संसर्ग झाला .

  • त्यांना सरकार कडुन काहीच मदत का मिळाली नाही ?
  • त्या पत्रकारांच्या कुटुंबाला कोणत्याही नेत्यानी भेट का दिली नाही ?
  • त्या पत्रकारांना सपकारनी का मोफत वैद्यकिय मदत दिली नाही ?
  • सरकार अश्या पत्रकारांना जिवन सुरक्षा विमा का देत नाही ?
  • पत्रकारां सोबतची ही उपेक्षित वागणुक आता तरी थांबेल का ?
    हाच पत्रकार समाजाचा व सरकारचाही मित्र आहे . प्रत्येक बातमी साजापुढे वेळेत देतो त्याला कसलही संरक्षण का मिळत नाही ? अजुन आमचे किती पत्रकार बांधव गेल्यावर या सरकारला जाग येणार .
    असेच चालु राहीले तर पत्रकारांचे भविष्य काय ? आणि भविष्यत कोणी पत्रकारितेकडे वळेल का हा प्रश्न सतावतोय आणि समाजसेवीका , पत्रकार व माणुस म्हणुन प्रश्न भेडसावतोय .
    सरकारकडे तळमळीची मागणी आहे मुख्यमंत्री साहेब पत्रकारांचे होणारे मृत्युचे प्रमाण कमी होण्यासाठी त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्या .
    पत्रकारांना जिवन दान द्या , आम्हालाही तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे . पत्रकार समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लावा हीच या निमित्ताने आपल्याला विनंती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *