
जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पला चालना दयावी

पालघर दि 1 : कोव्हीड रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी गरजू रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऑक्सीजन प्रकल्पाला चालना द्यावी असे निर्देश कृषी माजी सैनिक कल्यान मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते
यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड आणि को-वॅक्सीन लस प्राप्त झाली असून आतापर्यंत 2 लाख 20 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
• जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी बेड क्षमता कोरोना साथ Phase-1 कालावधी मध्ये 961 एवढी होती. आता कोव्हीड Phase-2 कालावधीत यामध्ये मोठ्या संख्येने वाढ करुन सद्यस्थितीत कोव्हिड रूग्णांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 2829 बेड्सची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले .
सध्या जिल्ह्यामध्ये आय. सी. यु. (ICU) बेड 31 तर व्हेंटीलेटर बेडची संख्या 67 इतकी आहे. या पेक्षा अधिक बेड संख्या वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यामध्ये 42 रुग्णालयाच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची सेवा करण्यात येत आहे.
लिक्विड मेडीकल ऑक्सीजन वितरकाची संख्या 2 असून या वितरकांच्या माध्यमातून जिल्ह्यात 11 मे. टन ऑक्सीजनची दैनिक आवश्यकता आहे. FDA कडून लिक्वीड मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा साधारण 25 मे.टन इतका होतो. तसेच विविध ऑक्सीजन कंपन्यांच्या माध्यमातून लिक्वीड मेडीकल ऑक्सीजनचा 25 मे. टन पुरवठा
होत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले ऑक्सीजन पुरवठ्याबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे. याची सुरुवात आपण पालघर, जव्हार, डहाणू या ठिकाणी ऑक्सीजन प्रकल्प स्थापन करून केली आहे. या प्रकल्पासाठी 3 कोटी 20 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पातून प्रतिदिन 1.25 मे. टन ऑक्सीजन निर्मिती होणार आहे. येत्या काही महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये बाहेरून ऑक्सीजन घेण्याची गरज भासणार नाही या प्रकल्पामुळे मृत्यूदर थांबवण्यासाठी आपल्याला मोठी मदत होईल असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
• कोव्हीड – 19 विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर आवश्यक असणारे 5293 रेमडीसिवीर इंजक्शन कोव्हीड रुग्णालयांना पुरविण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे कामगार गरजू व्यक्तींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घोषणा केल्या प्रमाणे पालघर जिल्ह्यात 13 शिवभोजन केंद्रावरून प्रति दिन 2850 थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.