वसई,दि.3 – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका संस्थेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे.किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष.अमर जगताप वसई येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष.अमर जगताप वसई यांच्याकडे असंख्य लोकांचे मदतीसाठी फोन येत असतात. रात्री अपरात्री ते आपलं घरदार सोडून जिवाची पर्वा न करता मदत करायला जातात. मग ती मदत त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर असली तरी ते मागे हटत नाही. सध्याच्या कॊरोना काळात कोणाला व्हेंटिलेटर तर कोणाला ऑक्सिजन बेड तर कोणाला प्लाझ्मा पाहिजे असतो, तर अनेकजण हॉस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी त्यांच्याकडे फोन करीत असतात. अश्या वेळी कोणतीही वेळ न पाहता अमर जगताप आपली टीम घेऊन निघतात.मुंबई मीरा रोड ते वसई, विरार परिसरात ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करीत असतात. साईनाथ सरापे नावाच्या रुग्णाचे बिल त्यांनी 50 हजार रुपयांनी कमी करून दिले, तर अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळवून दिला. असे अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्याकडे सर्व रुग्णालयांची यादी, फोन नंबर तसेच कोविड नियंत्रण कक्षाशी संपर्क असल्याने कोणत्या परिसरात, कोणत्या रुग्णालयात किती बेड खाली आहेत, याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे असते. अनेकांना फोनवरून तर काहींना प्रत्यक्षात भेटून त्यांचे हे कार्य चालू असते. किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट म्हणजे वसई विरार भागातील एक चालते फिरते मदत केंद्र झाले असून कॊरोना काळात त्यांची ही मदत मोठा हातभार लावत आहे. हे काम करीत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाकडेही लक्ष देता येत नाही. अश्याही परिस्थिती मध्ये करोना योध्दा लोकांना सेवा देत आहे. यांच्या या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

हाक तुमची साथ आमची
किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट
अमर जगताप 9975500506

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *