
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ,महाराष्ट्रात अतिशय गंभीर अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आपण पहात आहोत. आपली वसई आणि आपण वसईकर हि त्यास अपवाद नाहीत. परंतु आरोग्य व्यवस्थेच्या बाबत भूमिपुत्र म्हणून आणि सर्वच वसईकर याच्यावर ओढवलेले प्रसंग अत्यंत चिंताजनक आहेत. महापालिका व सर्वच प्रशासन यांचा वापर गेली ३०वर्षे स्थानिक सत्ताधारी यांनी ज्या पद्धतीने करून घेतला त्यामुळे प्रशासन आपली निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता गमावून बसलेले आहे की काय? असे दुर्देवी चित्र रोज पहावयास मिळत आहे. ओळख, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटना, पैसा ई हे सर्व असूनही, ना हॉस्पिटल, ना बेड,ना ऑक्सिजन, ना इंजेक्शन, ना परिपूर्ण उपचार ना, ना लस,ना कोणाला विचारायची सोय, जणू काही सर्वच व्यवस्था संपून आपण अनाथ झाल्याचे भयाण चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते व आजही आहे. काही संस्था आणि वैद्यकीय सेवाभावी व्यक्ती, काही अंशी प्रशासन निश्चितच आपल्या परीने आपले कर्तव्य बजावताना दिसत होत्या त्यांचाच तुटपुंजा आधार सर्वांना असल्याचे चित्र दिसत होते. त्यांचे विशेष आभार.

आज या बाबत स्थानिक भूमिपुत्र आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एकत्रित येऊन विचार केला नाही, तर येणारा काल कदाचित फार गंभीर असेल आणि त्या वेळेस कदाचित वेळ निघून गेलेली असेल. अनेक सहकारी व वसईकर यांच्याशी चर्चा करताना वरील विषया बाबत त्यांची सहमती लक्षात घेऊन या विषयाला धरून एक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आपला एकमेकांशी नियमित संवाद साधला जावा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
त्याला अनुसरून बुधवार दिनांक ५ मे २०२१ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता Zoom मीटिंग चे आयोजन करून या वसई संवाद उपक्रमास सुरुवात केली जाणार आहे. सद्य स्थितीतले प्रश्न त्याची एकजुटीने सोडवणूक करण्या बाबतची पुढीलदिशा यावर साधकबाधक चर्चा आपेक्षित आहे. आदरणीय खासदार महोदयांनी यात मीटिंग मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे.
आपणास मीटिंग ची लिंक आगाऊ पाठविण्यात येईल. आपले सर्वांचे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून सर्वांनी या मीटिंग मध्ये सहभागी व्हावेत असे