

विरार(प्रतिनिधी) :- रिपाइंचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनी वसई विरार महानगरपालिका चे आयुक्त याना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले कि,सद्या शासनामार्फत कोविड लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून वसई -विरार भागातील नागरीकांना वसई – विरार शहर महापालिकेमार्फत लसीकरण केंद्र सुरु आहेत. वसई तालुक्याची लोकसंख्या पाहता सद्या सुरु असलेली हि लसीकरण केंद्र अपुरी ठरत आहेत आणि सुरु असलेल्या लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक नागरीकांना मध्यरात्री तीन ते चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर लांब रांगा लाऊन लस न घेताच लसीकरण केंद्रावरुन परत घरी जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे याचा मोठा त्रास ४५ वर्षावरील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी भविष्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनू शकतात. तसेच लसीच्या दुसर्या डोसचा झालेला तुटवडा त्यामुळे या निर्माण झालेल्या संभ्रम परिस्थितीने भेदरलेल्या वरिष्ठ नागरिकांची संख्या हि दुर्देवाने मोठ्या प्रमाणात आहे
म्हणून आपण,वसई तालुक्यात लसीकरणाकरिता आवश्यक वाटल्यास स्वयंसेवी संस्थेच्या तसेच महाविद्यालयातील एन. एस. एस. व एन.सी.सी. व इतर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देवून त्यांच्या माध्यमातून व सहकार्याने लसीकरणांना वैद्यकिय कामाव्यतिरिक्त लागणारे मनुष्यबळ वाढवुन लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी. त्याकरिता वसई तालुक्यातील स्वयंम इच्छेने इच्छुक असणारे मोठ्या गृहनिर्माण संस्था , शैक्षणिक संस्थेच्या संकुलांमध्ये ज्यादा नव्याने लसीकरण केंद्र निर्माण करावे असे निवेदनात लिहिले आहे त्याची प्रत
१)माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन
२)माननीय आरोग्यमंत्री, महाराष्ट्र शासन
३)माननीय जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा
या विभागात पाठविण्यात आली आहे
