कोरोना संकटाने मागच्या वर्षभरात मुलांना शाळेच तोंड पाहता आले नाही . मुलाची शाळा ऑनलाईन झाली आणि हसत खेळत बागडणारी मुल घरात कोंडल्या गेली! ऑनलाईन शिक्षणात मुल रमली तर नाहीच पण शाळांची अवाढव्य फीस भरुन पालकांचा जीव गेला; पालक ही घरी बसुन होते , काम नव्हत , पैसे येणाचे मार्ग ही दिसत नसतांना शाळांनी मात्र फिस भरण्याचा तगादा सुरुच ठेवला . फिस न भरल्याने काही मुलांचे ऑनलाईन लिंक बंद केले . याचा निरागस मुलांच्या मनावर खुप परिणाम झाला , यामुळे काही मुल मानसिक आजारी पडले . ते पाहुन पालकही हवालदील झाले.
काही पालकांनी शाळेत धाव घेतली , शाळा व्यवस्थापनाकडे विनंती केली पैसे नंतर देतो आम्ही मुलांचे शिक्षण थांबवु नका , पण शाळांनी पालकांच्या विनंतीला काही दाद दिली नाही .
आता पुन्हा महिनाभरानी शाळा कदाचीत ऑनलाईन सुरु ही होतील . पुन्हा तेच फिसचे प्रश्न उभे राहतील . सामान्य माणुस म्हणजे पालक पुन्हा लाॅकडाऊन मुळे घरात आहे . एक ना अनेक प्रश्न तोंड आ करुन समोर उभे राहणार ? याच्यातुन मार्ग निघायला हवाच . प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे .
“हेच मुले उद्याचे देशाच भविष्य आहे “
मुलांच्या क्षिक्षणाची फी(शुल्क) अर्धी माफ होण गरजेच आहे , आजच्या कोरोना सारख्या संकटाचा परिणाम उद्याच्या भविष्यावर होता कामा नये.
शाळांनी मुलांच्या पालकांच्या मनस्थितीचाही विचार करायला पाहीजे , तशी चर्चासत्र झुम मिटींग द्वारे करावेत व मार्ग काढावा .
सर्वात महत्वाच आहे की मुलांना ऑनलाईन बसुन डोळ्याचे आजार , चष्मा लागणे , डोळ्यातुन पाणी येणे , डोळे जळजळने असे आजार वाढत आहेत! एका जागी बसुन त्यांचे मान पाठ ही दुखत आहेत त्या सगळ्याचे खर्च खुप वाढले आहेत;या सर्वात खर्चीक बाब म्हणजे ऑनलाईन शिक्षण असल्याने लाईट बिल व इंटरनेटचा खर्च ही वाढला आहे . या सर्व गोष्टी लक्षात घेवुन शाळांनी कमीत कमी फिस घेवुन शाळा चालु ठेवाव्यात! आता व्यस्थापन करण्यासाठी वेळ आहे मागच्या वर्षीचा अनुभव पाठीशी आहे म्हणुन माझी एक समाजसेवक या नात्यानी आपल्या कडील सर्व शाळा व मुख्यमंत्र्यांना व शिक्षण मंत्र्यांना ही विनंती आहे . वेळ अजुन गेलेली नाही शाळा सुरु होण्यासाठी बराच वेळ आहे याचा सदुपयोग करुन शाळांनी आपले व्यस्थापन करावे व जास्तीत जास्त फी (शालेय शुल्क) कमी करण्याचा प्रयत्न करुन मुलांचे भविष्य उज्वल करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *